
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील भावे हायस्कूलजवळ शनिवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली होती. अपघातातील जखमी झालेल सर्वजण हे एमपीएससीचा अभ्यास करणारे उमेदवार आहेत.
हे सर्वजण चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आले होते. या अपघातीतील जखमींची नावे समोर आले आहेत.
पुण्यात टपरीवर चहा प्यायला उभे असलेल्या १२ जणांना भरधाव कारने उडवल्याची घटना घडली. या अपघातात एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना भरधाव कारने कारचालकाने उडवले. जयराम शिवाजी मुळे असे आरोपी चालकाचे नाव आहे. दिगंबर यादव शिंदे आणि राहुल गोसावी असे इतर सहप्रवासी आहेत. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.
“अपघातातील जखमींची नावे”
अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदिप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
या अपघातातील तिघांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर नऊ जणांना टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात चार विद्यार्थ्यांचे पाय मोडले आहेत. भावे हायस्कूलजवळ हा संपूर्ण प्रकार घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सदाशिव पेठ परिसरात स्पर्धा परिक्षांचे क्लासेस असल्याचे राज्यातील अनेक भागांतून विद्यार्थी या ठिकाणी एमपीएससीची तयारी करण्यासाठी येतात. या परिसरात असलेल्या चहाच्या टपरीवर विद्यार्थी आले होते. त्यांनाच कारचालकाने उडवले. या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली.