
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या लहान बाळाची हेळसांड करून वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकावल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून आरोपी निलेश चव्हाणला ताब्यात घेतले आहे.
गेल्या दहा दिवसापासून निलेश चव्हाण फरार होता. त्याच्या शोध पोलीस घेत होते.
पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुनेला त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप हगवणे कुटुंबावर करण्यात आला होता. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली होता. त्यातच दुसरीकडे या प्रकरणात वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करून व वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकावल्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण गेल्या दहा दिवसापासून फरार होता.
वैष्णवीचे बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होते. वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे, त्यानंतर देखील त्याची काही प्रकरण समोर आली होती, त्यानंतर तो फरार झाला होता. निलेशच्याविरोधात स्टँडिंग वारंट देखील काढण्यात आले होते. सुरुवातील पोलिसांच्या तीन पथकांकडून निलेश चव्हाण याचा शोध घेण्यात येत होता, त्यानंतर पोलिसांची पथकं वाढवण्यात आली, सहा पोलिसांच्या पथकाकडू निलेश चव्हाणचा शोध सुरू होता, अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी दुपारी नेपाळ बॉर्डरवरून आरोपी निलेश चव्हाणला ताब्यात घेतले आहे.
वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला धमकावल्याचा आणि त्यांच्यावर बंदूक रोखल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता, त्याने नेपाळ गाठलं होतं. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली आहे, तो वैष्णवीची नणंद असलेल्या करिष्मा हगवणे हिचा मित्र आहे. अखेर आता पोलिसांनी त्याला नेपाळमधून अटक केलं आहे, त्याच्या अटकेनंतर आता या प्रकरणात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणात आरोपी असलेली वैष्णवीची सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना गुरुवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे. तर दुसरीकडे वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि सासरा राजेंद्र हगवणे हे पोलीस कोठडीत आहेत.