सातारा प्रतिनिधी
राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असतानाच आज सातारा जिल्ह्यामध्ये दोन रुग्ण आढळून आले आहेत. देशातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याचे समोर येत होते.
आज जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यापैकी एक रुग्ण कऱ्हाड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल आहे, तर दुसरा रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे; परंतु नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले आहे.


