
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत पहाटे पासून पावसाचा जोर सुरूच आहे. हवामान विभागाकडून मुंबई-ठाण्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांना पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागला.
मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प एक्वा लाइन-3 ला या पावसाचा फटका बसला आहे. 16 दिवसांपूर्वीच या मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मुंबई मेट्रो तीन प्रकल्प पहिल्याच पावसात पाण्यात गेल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक मेट्रो स्थानकात पाणी साचल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे दुपारी आचार्य अत्रे स्टेशनपर्यंतची मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती.
धक्कादायक बाब म्हणजे मेट्रोच्या स्थानकात पाणी साचलं होतं. आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाचे व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये मेट्रोच्या छतावरुनही पाणी कोसळत असल्याचं दिसून येत आहे.