पुणे प्रतिनिधी
पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वाघोलीत दहा एकर जमीन प्रकरणात हा प्रकार घडल्याच समोर आलं आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील 10 एकर जमिन हडपण्याच्या उद्देशाने संगनमत करून फौजदारीपात्र रचून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता बनावट महिला उभी करून ती मूळ जमिनीची मालक असल्याच भासवण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र लांडगे, अपर्णा यशपाल वर्मा या चार जणांच्या विरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी चंदननगर पोलिसांचे एक तपास पथक या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत आहे.संबंधित प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.


