
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रात ईडीने मोठी छापेमारी केली आहे. वसईत बड्या राजकीय पक्षाच्या नेत्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे.
वसई विरारमध्ये एकाच वेळी 13 ठिकाणी ईडीची छापेमारी करण्यात आली. या कारवाईमुळे वसई विरारमध्ये खळबळ उडाली आहे.
मुंबई जवळच्या वसई-विरार परिसरातील बहुचर्चित 41 बेकायदेशीर इमारती प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने थेट धाडसत्र राबवले आहे. बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीर इमारती उभ्या करून सामन्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडी दाखल केला गुप्तावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा केला आहे. ईडीकडून वसई विरारमध्ये 13 ठिकाणी मोठे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.
2006 साली सीताराम गुप्ता याने अग्रवाल, वसंत नगरी परिसरातील सर्वे क्रमांक 22 ते 30 मधील शासकीय आणि खासगी मालकीच्या जमिनींवर अतिक्रमण करत बांधकाम सुरू केले. या जमिनीत काही भूखंड हे डंपिंग ग्राउंड आणि एसटीपी प्लांटसाठी राखीव होते. गुप्ता याने 2010 ते 2012 या काळात या भूखंडांवर तब्बल 41 चारमजली इमारती उभ्या केल्या. यातील अनेक सदनिका गुप्ताने नागरिकांना विकल्या. कोर्टाकडून या इमारती बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. यानंतर वसई विरार महानगरपालिकेने या इमारतींवर हातोडा मारला. यामुळे जवळपास अडीच हजार लोक बेघर झाली आणि त्यांची आर्थिक फसवणूक झाली. ईडीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आता सर्च ऑपरेशन सुरू आहे.
त्याचबरोबर पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि परतवाडा मधील सोन्या चांदीच्या दुकानावर आयकर विभागाने सकाळपासून मोठ्या प्रमाणात छापेमारी करायला सुरुवात केली. त्यामुळे सराफा बाजारातील काही व्यावसायिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. तीनही जिल्ह्यातील पूनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स, आणि एकता ज्वेलर्स वर आयकर विभागाची ही छापीमारे सुरू असल्याची माहिती आहे. सोन्या चांदीच्या दुकानावर आयकर विभागाचे सकाळपासून छापीमारीचे सत्र सराफा बाजारातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.