
मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांसाठी एक आनं तुझंदाची बातमी आहे! बहुप्रतिक्षित नागरिकांच्या प्रतीक्षेत असलेली मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्यातील चाचणीला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले या चाचणीचे उद्घाटन झालं
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते. या मार्गिकेच्या चाचणीमुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे. दहिसर ते काशीगाव या दरम्यानच्या साडेचार किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर ही चाचणी घेण्यात येत आहे. ही मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे, यामुळे दहिसर आणि मीरा भाईंदर या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भाईंदर पाडा उड्डाणपुलाचेही लोकार्पण
आज दुपारी 12 वाजता काशीगाव मेट्रो स्थानकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह MMRDA चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाईंदर पाडा उड्डाणपुलाचेही लोकार्पण केले. या चाचणीमुळे मुंबईच्या मेट्रो जाळ्याचा विस्तार आणि पश्चिम उपनगरातील दळणवळणाला गती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
मेट्रो 9 चा पहिला टप्पा: दहिसर ते काशीगाव
मुंबई मेट्रो लाइन 9 ही मेट्रो लाइन 7 ची विस्तारित शाखा आहे, जी दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर दरम्यान एकूण 13.5 किमी लांबीचा मार्ग कव्हर करते. या प्रकल्पाची पहिली टप्पा चाचणी दहिसर पूर्व ते काशीगाव या 4.97 किमी लांबीच्या मार्गावर आजपासून सुरू झाली आहे. या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंग वाडी, मिरागाव आणि काशीगाव ही चार स्थानके कार्यान्वित होतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित चार स्थानके साई बाबा नगर, मेदित्या नगर, शहीद भगतसिंग गार्डन आणि सुभाष चंद्र बोस स्टेडियम – कार्यान्वित होतील. दुसरा टप्पा डिसेंबर 2025 नंतर सुरू होण्याची शक्यता आहे.