
नवी दिल्ली वृत्तसंस्था
अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे, याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली आहे. भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम केला तरी अवघ्या तीन तासानंतर पाकिस्तान कडून पुन्हा शस्त्र संधीचे उल्लंघन केले आहे. भारतीय सीमेवर गोळीबार करत आहे. या गोळीबाराला भारतीय बीएसएफचे जवान चोख उत्तर देत आहेत.
युद्धविरामाला सहमती दर्शवतानाच भारतानं मोठी घोषणा केली आहे, दहशतवाद्यांविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नाही अशी घोषणा भारताच्या वतीनं यावेळी करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या यशस्वी मध्यस्थिनंतर दोन्ही देशांनी युद्धविरामाचा निर्णय घेतला आहे, युद्धविरामाचा निर्णय घेतल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांदी दोन्ही देशांचं अभिनंदन देखील केलं आहे.
दरम्यान युद्धविराम झाला असला तरी देखील पाकिस्तानच्या अडचणी मात्र संपलेल्या नाहीत. पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली होती. भारतानं सर्वात आधी सिंधू नदी जल वाटप करार स्थगित केला होता, त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आहे. तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान आज भारतानं जरी युद्धविरामाला संमती दिली असली तरी देखील सिंधू जल वाटप करारावरची स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे, त्यामुळे युद्धविरामानंतर देखील पाकिस्तानच्या अडचणी कायम राहणार आहेत. सिंधू नदी पाणी वाटप करारावरची स्थगिती उठवण्यात आली नसल्यानं याचा मोठा फटका हा भविष्यात पाकिस्तानला बसू शकतो. दुसरीकडे वर्ल्ड बँकेनं देखील भारताच्या या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही अशी आपली भूमिका स्पष्ट करताना वर्ल्ड बँकेनं म्हटलं आहे.
दरम्यान भारताच्या ऑपरेशन सिंदूरनतंर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला होता. पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, भारतानं हा हल्ला परतून लावला, प्रत्यु्त्तर म्हणून भारतानं देखील पाकिस्तानवर हल्ला केला, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं, अखेर त्यानंतर आता दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे.
मात्र साडे पाचच्या दरम्यान पूर्णविराम दिल्याचं सांगण्यात असलं तरी अवघ्या तीन तासात पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचा उल्लंघन झालं आहे पंजाब मधल्या फिरोजपुर पठाणकोट मध्ये ब्लॅक आऊट असून पाकिस्तान कडून भारतीय सीमेवर गोळीबार करण्यात येत आहे तसेच जम्मू आरएसपुरा सेक्टर मध्ये पाकिस्तानचा गोळीबार सुरू आहे पाकिस्तानच्या गोळीबाराला बीएसएफ जवानाकडून चोख उत्तर देण्यात येत आहे.