
नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारताती लष्कराने 7 मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरु केलं. अजूनही हे ऑपरेशन सुरु आहे. भारताच्या सैन्य दलांनी आपली वायू शक्ती दाखवून दिली आहे. पाकिस्तानातील 8 एअर बेस उडवल्याची माहिती आहे.
भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मूळात हे ऑपरेशन 7 मे रोजी सुरु झालं. त्यावेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ एअर स्ट्राइकमध्ये उद्धवस्त केले. लश्कर, जैश आणि हिजबुल मुजाहिदीन यांचे दहशतवादाचे अड्डे उडवण्यात आले. या कारवाईत किती दहशतवादी मारले गेले, त्यांचे वेगवेगळे आकडे सांगितले जातात. पण आता या कारवाईत जे पाच मोठे दहशतवादी मारले गेले, त्यांची नाव समोर आली आहेत.
1 )मुदस्सर खादियन खास ऊर्फ मुदस्सर, अबू जुंदाल,
दहशतवादी संघटना – लष्कर-ए-तैयबा
मुरीदकेमधील मर्कझ तैयबाचा प्रमुख
पाकिस्तान लष्कराकडून मानवंदना देऊन दफन विधी
पाकिस्तान लष्कर प्रमुख आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण.
जमाच उद दावाचा जागतिक दहशतवादी हाफीज अब्दुल रौफ यांच्या नेतृत्वाखाली सरकारी शाळेत दफनविधी पार पडला.
पाकिस्तान लष्कराचे लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे आयजी प्रार्थना सभेला उपस्थित
2 )हाफीज मुहम्मद जमील
जैश-ए-मोहम्मद
मौलाना मसूद अजहरचा मेहुणा
बहावलपूरमधील मर्कझ सुभान अल्लाहचा प्रमुख
जैश-ए-मोहम्मदसाठी निधी गोळा करायचा. युवकांना कट्टरपथांची शिकवण द्यायचा.
3 )मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्तादजी, उर्फ घोसी साहब
जैश-ए-मोहम्मद
मौलाना मसूद अजहरचा मेहुणा
जैशच्या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र चालवण्याच प्रशिक्षण द्यायचा.
जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यात सहभागी
IC-814 अपहरण प्रकरणात वाँटेड,
4. )खालिद उर्फ अबू आकाशा
लष्कर-ए-तैयबा
जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यात सहभागी
अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्र तस्करीत सहभाग
फैसलाबादमध्ये अंत्यविधी. पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित,
5 )मोहम्मद हसन खान
जैश-ए-मोहम्मद
मुफ्ती अजगर खान काश्मिरीचा मुलगा. POK मधील जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर.