
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकालाबद्दल मंडळाने अधिकृतरित्या कळवले आहे.
बारावीचा निकाल उद्या म्हणजेच 5 मे रोजी 2025 दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.
बारावीचा निकाल कधी लागणार याचा विद्यार्थ्यांमध्ये मोठा सम्रंभ होता आणि पालकांनाही त्यांच्या पाल्याच्या निकालाची काळजी लागलेली होती आता थेट तारीखच आल्याने सर्व सम्रंभ दुर झाला आहे. खुद्द बोर्डानेच आता तारीख जाहीर केली असून उद्या यासंदर्भात बोर्ड सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती बोर्डाचे सचिव देविदास कुलाळ यांच्यामार्फत देण्यात आली आहे.
राज्यभरातून 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. मुंबई विभागातून एकूण 3 लाख 42 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.
वाणिज्य शाखेतून सर्वाधिक म्हणजेच एक लाख 66 हजारांवर विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. त्यानंतर विज्ञान शाखेच्या 1 लाख 27 हजार 704 विद्यार्थ्यांनी तर कला शाखेच्या 47 हजार 879 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे बारावीची परीक्षा घेण्यात आली.. यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा वेळ वाढवून दिला होता. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती, काॅपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळाने मोहिमही राबवली होती.
बारावी परिक्षेचा निकाल कुठे आणि कसा पाहायचा?
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
महाराष्ट्र SSC, HSC Result 2025 निकाल कसा बघायचा?
सर्वात आधी mahresult.nic.in ला भेट द्या. त्यानंतर “महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025” लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा हजेरी नंबर आणि आईचे नाव (प्रवेशपत्रानुसार) त्यामध्ये भरा. “निकाल पहा” यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा महाराष्ट्र बोर्ड निकाल 2025 तुम्हाला दिसेल. निकाल तुमचाच आहे का हे याची पडताळणी करा. यानंतर
पुढच्या शैक्षणिक प्रक्रियेसाठी आणि भविष्यासाठी निकाल डाऊनलोड करा, स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही प्रिंटही काढू शकता.