
पुणे प्रतिनिधी
पुणे शहरातून तडीपार केले असताना
पुन्हा शहरात येऊन शस्त्र बाळगून लोकांमध्ये दहशत पसरविणार्या दोघा तडीपार गुंडांना खंडणी विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून दोन घातक शस्त्रे जप्त केली.
त्याचवेळी दोघा सराईत गुन्हेगाराकडून १ पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
गणेश गौतम वाघमारे (वय २८, रा. रामकृष्ण मठासमोर, दांडेकर पुल) आणि त्याचा मित्र तेजस काशिनाथ शेला (वय २५, रा. रामकृष्ण मठासमोर, दांडेकर पुल) अशी अटक केलेल्या दोन सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
पुणे खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार राजेंद्र लांडगे, पोलीस अंमलदार अमर पवार, मयुर भोकरे यांना माहिती मिळाली की, मोक्क्यातून सुटलेला गणेश वाघमारे हा गावठी पिस्टल बाळगून आहे. या बातमीनुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्टलबाबत चौकशी केल्यावर त्याने पिस्टल आहे, पण ते माझा मित्र तेजस शेलार याने विकत आणले आहे.
ते आमच्या दोघांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही दोघे वापर करत असतो. आता ते पिस्टल शेलारकडे आहे. त्याप्रमाणे शेलार याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ३५ हजार ४०० रुपयांचे गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळाली. पर्वती पोलीस ठाण्यात त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केलेला रेकॉर्डवरील गुंड प्रथम ऊर्फ पॅडी सुरेश म्हस्के (वय २०, रा. दांडेकर पुल) हा पर्वती परिसरात आणि रोशन अविनाश काकडे (वय २४, रा. तुकाईनगर समाज मंदिरामागे, सिंहगड रोड) सिंहगड रोड परिसरात धारदार शस्त्रासह फिरत होते. खंडणी विरोधी पथकाने या दोघांना शस्त्रासह पकडले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे, अमर पवार, मयुर भोकरे,दुर्योधन गुरव, सयाजी चव्हाण, गीतांजली जांभुळकर, प्रविण ढमाळ, रणजित फडतरे, लहु सूर्यवंशी, विजय कांबळे यांनी या कारवाईत सहभाग होता.