
पुणे प्रतिनिधी
जिल्ह्यातील कामे वेगाने करावी केवळ फाट्या टाकण्याचं काम करू नका? अशी तंबी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना पवार यांनी दिली
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे स्टेशन येथील विधान भवन येथे पार पडली. त्या बैठकीला उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह पुणे शहर आणि जिल्ह्यातील आमदार पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान अजित पवार म्हणाले, पुणे शहर आणि जिल्ह्यातील कामे लवकरात लवकर आणि दर्जात्मक झाली पाहिजेत. मला कामाच्या दर्जात अजिबात तडजोड नको. यावेळी बैठक लवकर घेण्याचं कारण ते आहे. पाट्या टाकायचे काम करू नका, या सर्व कामांच्या दर्जाची पाहणी करण्यासाठी एक एजन्सी नेमली जाणार आहे आणि ती एजन्सी जिल्ह्यातील प्रत्येक कामाची पाहणी करणार असल्याचे सांगत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली.