
सातारा प्रतिनिधी
पोलीस आणि नागरिक यांच्यातील सामंजस्य असावं तसेच समाजातील समाजकंटकांच्या बेकायदेशीर कामांना वेळेवर आळा घालून जेरबंद करता येईल. सर्वसामान्य जनतेची संपर्क वाढवून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना व्हाट्सॲप क्रमांक दिले आहेत.
याच अनुषंगाने फलटण तालुक्यातील फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यासाठी 8975426100, तर फलटण शहर पोलिस ठाण्यासाठी 9689901100 हा व्हाट्सॲप क्रमांक सुरु करण्यात आला आहे.
पोलिस महासंचालक महाराष्ट्रराज्य मुंबई यांचे आदेशान्वये व जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिस ठाणे, सर्व उपअधीक्षक कार्यालयांमध्ये व नियंत्रण कक्ष, सातारा येथे टेबलेट्स पुरवण्यात आले असून, त्यामध्ये व्हाट्सॲप सेवा सुरु करण्यात आलेली आहे.
ग्रामस्थांनी आपल्या परिसरातील माहिती तक्रारी, अडचणी संबंधित पोलिस ठाणे, वरिष्ठ कार्यालयास व्हिडिओ, फोटो पाठवाव्यात असे आवाहन शहर व तालुका पोलिस प्रशासनाच्या यांच्या वतीने करण्यात आले आहे.