
सातारा प्रतिनिधी
शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत दोन इसमांकडून देशी बनावटीचे पिस्टल व मोटारसायकल असा एकूण १,२५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत आरोपींना अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, मोळाचा ओढा सातारा ते करंजे नाका रस्त्यावर पेट्रोलिंग करताना संशयित दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलीसांना पाहून ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी तत्काळ त्यांना पकडले. तपासणी दरम्यान त्यांच्याकडे पिस्टल मिळून आले, मात्र ते कोणताही परवाना न दाखवता त्यांनी बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र बाळगल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर आरोपी रवी रवींद्र जाधव (वय २३, बेघर वस्ती, भुईंज, ता. वाई) व रेवणसिद्ध भिमाअण्णा पुजारी (वय २७, रा. सोसायटी जवळ, भुईंज, ता. वाई) यांच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या कारवाईत ७५,००० रुपये किंमतीचे अग्नीशस्त्र आणि ५०,००० रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण १,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीशशश राजीव नवले व पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कुमार ढेरे व अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे यांनी.