
मुंबई प्रतिनिधी
श्रमिकराज जनरल कामगार संघटनेच्या गोरेगाव तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच श्री अतुल विजय माने यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रा.देवीदासजी पंडागळे हे या कामगार संघटनेचे अध्यक्ष असून उच्चशिक्षित असून समाजातील शोषित कामगारांसाठी नेहमीच काम करत आले असून त्यांना न्याय व हक्क मिळवून दिले आहेत.मुंबईबाहेर सुद्धा श्रमिकराज जनरल कामगार संघटना उत्तमरित्या कार्य करत असून पुणे,अहमदनगर,यासह अन्य शहरात ही कामगारांचा हक्काचा आवाज म्हणून संघटना चांगलीच परिचित आहे.
यावेळी अतुल माने यांनी प्रा.देवीदासजी पंडागळे यांनी कामगारांसाठी काम करण्यासाठी त्यांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले.