
मुंबई प्रतिनिधी
उद्या शनिवारी फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण या शनिवारी आणि रविवारी रात्री मध्य रेल्वेकडून विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांनी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे.
शनिवारी आणि रविवारी रात्री मध्य रेल्वे मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण ते बदलापूरदरम्यान हा ब्लॉक असणार आहे. या दोन्ही स्टेशन दरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर्सचे डि-लॉचिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे ५ तारखेला म्हणजेच शनिवारी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
त्याचबरोबर कल्याण आणि बदलापूरदरम्यान नवीन पाइपलाइन पुलाच्या बांधकाम करण्यात येणार आहे. त्या बांधकामासाठी शनिवारी आणि रविवारी रात्री अप आणि डाउन दक्षिण-पूर्व मार्गांवरील ६२/८८० किमीवरील असलेल्या विद्यमान रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) च्या ४ गर्डर्सचे डि-लाँचिंग करण्यात येणार आहे.
दोन रोड क्रेनचा वापर करून विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दिनांक ०६.०४.२०२५ (शनिवार/रविवारच्या मध्यरात्री) रोजी ०१.३० वाजता ते दिनांक ०६.०४.२०२५ (रविवार पहाटे) रोजी ०४.३० वाजता अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान परीचालीत करण्यात येईल. हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान कल्याणला नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना ठाणे येथे थांबा देण्यात येणार आहे.
ब्लॉकमुळे पुढीलप्रमाणे परिणाम होतील:
अप मेल/एक्सप्रेस गाड्या वळवण्यात येतील
खालील गाड्या कर्जत -पनवेल -दिवा मार्गे वळवण्यात येतील.
ट्रेन क्रमांक 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस,
ट्रेन क्रमांक 18519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,
ट्रेन क्रमांक 12702 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेनसागर एक्सप्रेस,
ट्रेन क्रमांक 11140 होसपेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि
ट्रेन क्रमांक 22158 चेन्नई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस.
अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे नियमन
ट्रेन क्रमांक 22178 सिकंदराबाद -राजकोट एक्सप्रेस ०४.१० ते ०४.३० वाजेपर्यंत वांगणी स्टेशनवर नियंत्रित केली जाईल.
ट्रेन क्रमांक 11022 तिरुनेलवेली -दादर एक्सप्रेस ०४.१७ ते ०४.२७ वाजेपर्यंत नेरळ स्टेशनवर नियंत्रित केली जाईल.
उशिराने चालणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्या/हॉलिडे विशेष गाड्या परिचालन गरजेनुसार वळवल्या जातील.
ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे काम
ब्लॉक कालावधीत अंबरनाथ आणि कर्जत स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
उपनगरीय गाड्यांचा विस्तार / शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन
परळ येथून २३.१३ वाजता सुटणारी (पीए३) परळ- अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यासाठी वाढवली जाईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.५१ वाजता सुटणारी (बीएल६१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- बदलापूर लोकल अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता सुटणारी (एस१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत लोकल अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
कर्जत येथून ०२.३० वाजता सुटणारी (एस२) कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ येथून शॉर्ट ओरीजनेट केली जाईल आणि अंबरनाथ येथून ०३.१० वाजता सुटेल.
कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष लोकल कर्जत येथून ०४.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०६.०८ वाजता पोहोचेल.