
सातारा प्रतिनिधि न्युज नेटवर्क.
सातारा – गेल्या काही महिन्या पासून अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय.विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमी वर जोरदार नेत्यांची इनकमिंग शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर संपूर्ण खालसा झालेला पक्ष पवारांनी पुन्हा एकदा उभा केलाय. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीत सुरु असलेल्या पक्ष प्रवेशांवर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केलं आहे. अतुल भोसले यांचा फार्म भरल्यानंतर उदयनराजे यांची कराड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, फोडाफोडीचं राजकारण आज झालेलं नाही. तुम्हीच विचार करा किती जण फोडलेत. फोडाफोडीचं जाऊद्या, आम्ही बघून घेऊ. मी पवार साहेबांचा आदर राखतो. मी वयाचा सन्मान राखून बोलतो. फोडा फोडी सुरु आहे. शरद पवारांना फोडाफोडीचा नोबेल दिला पाहिजे, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांनी जोरादार टीका केलीये. शरद पवार यांच्या पक्षात सुरु असलेल्या इनकमिंगबाबतच्या प्रश्नावर उदयनराजे यांनी मिश्किल उत्तर दिलं आहे.
शरद पवार गटाकडून उदयनराजेंना जोरदार प्रत्युत्तर
उदयनराजे भोसलेंच्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी x प्लॅटफॉर्मवरुन प्रत्युत्तर दिलं आहे. विद्या चव्हाण लिहितात, राजे, शुध्दीवर अहात ना? मग स्वतःची मेमरी अप डेट करा! 50 कोटीचे खोके देऊन ,फोडाफोडीच राजकारण उर्फ अनाजी पंतांना नोबेल पुरस्कार द्या! जाणता राजा असलेल्या शरदचंद्र पवार” “तुतारी” ने अवघा महाराष्ट्र जादुई झालाआहे! राजे हरतां,हरतां पिपाणीने वाचवलं तुम्हाला !