
मुंबई प्रतिनिधी
मुंबई:खेरवाडी तालुका काँग्रेस कमिटी रोजगार विभाग, डॉ. आदिती मेडिकल, वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खार पूर्व येथील पाईपलाईन जवळील धोबी घाट येथे विभागातील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व अल्प दरात चष्मा वितरण शिबिराचे आयोजन 23 मार्च 2025 रोजी करण्यात आले होते.
या शिबिरात स्थानिक शेकडो नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला.या शिबिराचे आयोजन काँग्रेसचे उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष रोजगार विभाग संजय सिंग, वांद्रे पूर्व तालुका अध्यक्ष रोजगार विभाग विनायक पाटील, व तालुका अध्यक्ष ओबीसी विभागाचे राजेंद्र बावडेकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष वरिष्ठ नेते अर्जुन सिंग, तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.