सातारा प्रतिनिधि न्युज नेटवर्क.
महानगरी मुंबई मध्ये गेल्या एक महिन्या आधी चेंबूर सिद्धार्थ नगर परिसरात दुमजली घराला भीषण आग लागून गुप्ता परिवाराच्या एकाच कुटुंबा मधील सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.आता पुन्हा सिंधी कॅम्प परिसरात असलेल्या संतोषी माता मंदिरात त्याच चेंबूर मध्ये पुन्हा आग लागल्याची घटना समोर येत आहे
मिळालेल्या माहितीनुसार,मुंबईतील चेंबूर सिंधी कॅम्प परिसरात असलेल्या संतोषी माता मंदिरात शनिवार दि.१९अक्टोबर रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंदिरात अचानक आग लागल्यानंतर लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांनी माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
सिंधी कॅम्प परिसरातील संतोषी माता मंदिरात आग लागलेल्या घटनेत आतापर्यंत कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी आग लागल्यानंतर आकाशात धुराचे प्रचंड लोट दिसत आहे. तसेच तिथे लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. आग लागल्यानंतर साधा पाय ठेवायला जागा नाही, इतकी प्रचंड गर्दी घटनास्थळी झाली आहे. मंदिराजवळ जमलेले लोक घटना कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत.


