
मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही. परंतु त्यात काही दुरुस्ती केली जाईल आणि फक्त गरीब महिलांनाच लाडकी बहीण योजनेला लाभ मिळेल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. या आधी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाही, असेही ते म्हणाले.
विधानसभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणि लाभार्थी महिलाबाबत उत्तर दिले. अजित पवार म्हणाले, राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही केवळ गरीब महिलांसाठी आहे. त्या दृष्टीने या योजनेत दुरुस्ती करावी लागणार आहे. योजनेतील लाभार्थींना निवडणुकीच्या वेळी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाही, हे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं. विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही, परंतु गरज संपलेल्या, द्विरुक्ती असलेल्या योजना बंद करण्यात येतील. त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची देखील तरतूद करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अपात्र बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नाही…
लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. निकषात न बसल्याने ज्या लाभार्थी महिलांना योजनेतून वगळ्यात आलं आहे, त्याच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाही, असे देखील अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. लाडकी बहीण योजना बंद होईल, अशा वावड्या उठवल्या जात आहे. परंतु ही योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी दिली आहे.