
वार्ताहर- स्वप्नील गाडे
मुंबई- जयदीप जोगेंद्र कवाडे यांची लघु उद्योग महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या अध्यक्ष(राज्यमंत्री)दर्जा पदी निवड करण्यात आली.
झुंजार नेते संसदभवन आपल्या भाषणातल्या शब्द शैलीतून गाजवणारे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खाजदार जोगेंद्र कवाडे यांचे सुपुत्र हे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवा नेतृत्व करणारे नेते आयु.जयदीप जोगेंद्र कवाडे यांची मंगळवार१५अक्टोबर२०२४ रोजी लघु उद्योग महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या अध्यक्ष(राज्यमंत्री)दर्जा पदी.मंत्रिमंडळाने निवडकेली आहे त्या बद्दल पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उत्तरमध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष माननीय.सुनील सोनी यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.