
मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, संतापाची लाट उसळली. त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती, आज अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर आता विरोधक देखील आक्रमक झाल्याचं चित्र आहे.
तर शिवसेना ठाकरे गटाते आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठ्या मागण्या केल्या आहेत. सुधारित चार्जशीट दाखल करा, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, सरकार बरखास्त करा असं ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंच्या तीन मागण्या
माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मिडीयाच्या माध्यमातून आम्हाला धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती मिळाली आहे. फक्त राजीनामा स्वीकारून चालणार नाही, तर हे सरकार बरखास्त केलं गेलं पाहिजे. संपूर्ण राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील परिस्थिती आपण पाहतात. कुठे लहान मुलींवर अत्याचार, कुठे महिलांवर रेप होतो. मग तिथे गृहराज्यमंत्री बोलतात की, हे सगळं शांततेत पार पडला आणि म्हणून काही ॲक्शन करू शकत नाही.
बसमध्ये एखादा रेप होतो आणि मंत्री सांगतात, आम्ही अवेअरनेस वाढवायचा प्रयत्न करतो. तसंच संतोष देशमुख प्रकरणी आपल्याला आठवत असेल साधारणपणे डिसेंबरपासून हा विषय सुरू आहे. खून कधी झाला त्याच्यानंतर जे अधिवेशन झालं. ते अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळेच आमदारांनी हा विषय घेतला होतं, हे प्रकरण नागपूरमध्ये लावून धरला होता आणि आम्ही हीच मागणी करत होतो की, एका पारदर्शक चौकशीसाठी ज्यांचं नाव येते आका म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, आम्हीच नाही तर भाजपचे देखील नमिताताई असतील, सुरेश धस असतील हे देखील स्वतः भाजपचेच आमदार राजीनामाची मागणी करत होते.