
मुंबई प्रतिनिधी
सुमारे 4 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात असून सर्वांच्या नजरा तारखाकडे लागल्या आहेत.
दुसरीकडे राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली गेली आहे.
राज्यातील 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. तसेच, राजकीय पक्षांनीही मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षाचे मेळावे व बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ दिलं जात आहे.
राज्यातील दीर्घकाळ प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती एन. के. सिंग यांच्या खंडपीठापुढे अखेर मंगळवारी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीत निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.