
मुंबई प्रतिनिधी
ज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने यावर्षीही अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मागील वर्षी देखील ही योजना राबविण्यात आली होती. यावर्षीही होळीपूर्वी साडी वाटप होण्याची शक्यता आहे.
फक्त अंत्योदय कार्डधारक महिलांसाठी योजना
ही योजना केवळ अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील महिलांसाठीच लागू आहे. लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी दिली जाणार आहे. ही योजना गरीब कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. विभागाने वाटपाची तयारी पूर्ण केली असून, लवकरच साड्यांचे वितरण करण्यात येईल.
१२७ लाख महिलांना मिळणार लाभ
नागपूर जिल्ह्यात एकूण १ लाख २७ हजार २०८ अंत्योदय कार्डधारक आहेत, यामध्ये ४५,९१२ शहरी आणि ८१,२९६ ग्रामीण भागातील लाभार्थी आहेत.
प्रत्येक लाभार्थी महिलेला एक साडी मोफत मिळणार आहे.
या संदर्भात रेशन विभागाने राज्य यंत्रमाग महामंडळाकडे साड्यांची मागणी केली आहे.
होळीपूर्वी होणार साडी वाटप
मागील वर्षी होळीच्या सणानिमित्त साडी वाटप करण्यात आले होते. यंदाही होळी सण येत्या महिन्यात असल्याने, साडी वाटप होळीपूर्वीच करण्यात येईल, अशी शक्यता आहे.