
मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि संस्थापक शरद पवार यांचे जवळचे सहकारी स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले आहे.५३ वर्षांपासून शरद पवार यांच्या सोबत ते कार्यरत होते. अलीकडेच ते शारीरिक तक्रारीमुळे ते घरीच होते.
अतिशय विश्वासू, मेहनती सचोटीने वागणारा, निस्वार्थी हसतमुख असणारा प्रत्येक व्यक्तीशी आदराने वागणारा, प्रत्येक व्यक्तीचं काम पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणारा, अशा नीराळ्या सहकार्याच देहवासन झालं याचं तीव्र दुःख होत असल्याचा शरद पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
आपल्या कामाचा व्याप जसा वाढत जातो तेव्हा अशी काही माणसे जवळ असावी लागतात की ज्यांच्या सहकार्याने आपण निश्चिंतपणे वेगवेगळ्या प्रकारची कामे करु शकतो. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते निश्चिंतपणे, प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यात आपल्याला मागे वळून पाहावे लागत नाही, अशातीलच धुवाळी होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचे दु:ख होते आहे. त्यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो, अशा शब्दात शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.