
मुंबई प्रतिनिधी
शिवाजी महाराज उत्तम योद्धेच नव्हते तर उत्तम प्रशासकही होते. शिवाजी महाराजांचे गड, किल्ले आमच्यासाठी कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यावरील अतिक्रमणं काढण्याचा निर्णय घेतल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पुणे येथे शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी शिवरायांचे विचार आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली आणि शिवरायांचा गौरव केला.
शिवरायांनीत आत्माभिमान जागृत केला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आई जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं. देशात त्या काळी सुरु असलेला दुराचार दुर करुन स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली. शिवरायांनी अठरापगड जातीतील मावळे गोळा करुन स्वराज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांनी देशाचा आत्माभिमान जागृत केला.
उत्तम योद्धेच नाही तर शिवाजी महाराज उत्तम प्रशासकही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवरायांनी स्वराज्य स्थापन करुन आत्माभिमान जागृत करण्याचे काम केले. 140 कोटी लोकांचा हा देश असून या देशाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. ते देशाचे आत्माभिमान आहे. राज्य कारभार कसा चालवायचा याचे मानक त्यांनी सांगितले आहे. ते केवळ योद्धेच नव्हते तर ते उत्तम प्रशासक होते. व्यवस्थापन, पर्यावरण, जलसंरक्षण आणि इतर गोष्टी त्यांनी केल्या. ते आदर्श राजे होते. त्यांना श्रीमंत योगी, जानता राजा आपण म्हणतो कारण त्यांनी स्वःतसाठी काहीच केले नाही तर रयतेसाठी त्यांनी कार्य केले.
मंदिरापेक्षा गड किल्ले मोठे अन् महत्वाचे
देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्यापेक्षा कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. या किल्ल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी आपण काम करत आहोत. गड किल्ल्यांची निगा राखावी ते अबाधित राहावे यासाठी सातत्याने काम करत आहोत. अनेक कामे आपण सुरु केले आहे. शिवनेरीचे रुप आपण पाहत आहोत. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरील सर्व अतिक्रमणं काढण्याचा निर्णय घेतला आहे.
गड, किल्ले जागतिक वारसास्थळात आणण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ प्रतियोगितेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले नाॅमिनेट केले आहेत. आता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या नैतृत्वात या वारसास्थळाचे सादरीकरण होणार आहे. पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धनाचा उत्तम नमुना किल्ले कसे आहेत हे दाखवून देणार आहेत. त्यातून जगात भारतातील शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा प्रसार होईल आणि जगातील लोक हे किल्ले पाहण्यासाठी येतील.
शिवनेरीचा विकास करण्यासाठी कटीबद्ध
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवनेरी परिसराचा विकास करण्यासाठी मी कटीबद्ध आहे. अजित पवार, एकनाथ शिंदेंसह मी येथे आहे आम्ही तिघे येथे शासक नाही तर शिवरायांचे मावळे म्हणून आहोत. आम्ही तिघे मिळून शिवरायांच्या किल्ल्यांचे आणि गडाचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेत आहोत.