
मुंबई प्रतिनिधी
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)मुंबई सचिव पदी कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी निवड करण्यात आली. माकपच्या २४ व्या मुंबई अधिवेशनात ही निवड करण्यात आली. या अधिवेशनात ३१ सदस्यीय जिल्हा समिती निवडण्यात आली.तर मावळते सचिव डॉ. एस. के. रेगे यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे घेतली.
शैलेंद्र कांबळे साधारण १९८५ च्या दरम्यान माजी खासदार कॉम्रेड अहिल्याताई रांगणेकर, कामगार नेते कॉम्रेड प्रभाकर संझगिरी, कॉम्रेड सुशील वर्मा आणि धारावीतील माजी आमदार कॉम्रेड सत्यंद्र मोरे या कमुनिस्ट नेत्यांच्या संपर्कात आले. या नेत्यांच्या प्रभावामुळे अखेर १९८७ कॉम्रेड कांबळे यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मेंबरशिप स्वीकारून कमुनिस्ट चालवाळीत कार्यास सुरुवात केली.
महाराष्ट्रात झालेल्या दलित अत्याचारा विरोधात झालेल्या आंदोलनात, इतर समाजिक राजकीय आंदोनात आणि कमुनिस्ट पक्षाच्या आंदोनलात सक्रिय राहिले. दलित मुक्ती शोषण मंच या अखिल भारतीय संघटनेच्या उपाध्यक्षपदी ते काम करत आहे. जाती अंत संघर्ष समितीच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. पक्षाच्या कामगार, आणि दलित आंदोलनासह सर्व प्रकारच्या आंदोलनत त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन प्रसंगी जेल मध्ये सुद्धा जावे लागले. जनआंदोलनात त्यांनी पंधरा दिवसांचा तुरुंगवास भोगला. डाव्या, आंबेडकरवादी आणि लोकशाहीवादि राजकीय आघाडी व्हावी यासाठी काम केले. तसेच कॉम्रेड कांबळे यांनी मीरा रोड-विरार रेल्वे प्रवाशांसाठी ‘प्रवास अधिकार आंदोलन समिती’ च्या वतीने केलेली आंदोलन गाजली. रेल सत्याग्रह, रेल युथ मार्च, ऐतिहासिक रेल बहिष्कार सारखे आंदोलन करण्यात आले. या समितीचे नेतृत्व कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांनी केले.