
मुंबई प्रतिनिधी
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (सोमवारी) सकाळी भेट झाली. या भेटीवरून राजकीय चर्चांना उधान आले असतानाच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री सुभाष देसाई हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगाल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
उद्धव ठाकरे हे पुन्हा देवेंद्र फडणवीसांची जवळीक साधत असल्याच्या चर्चा होत्या. त्यामध्ये मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने काही तरी शिजत असल्याचा संशय राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो आहे.
मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील असल्याने नेमकी ही भेट राजकीय कारणासाठी आहे की आणखी काही याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजपशी जवळी साधली जात असल्याचे बोलले जात आहे.
ठाकरेंनी फडणवीसांवर टीका टाळली
उद्धव ठाकरे यांची नुकतीच मुंबईमध्ये जाहीर सभा झाली होती. या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जहरी टीका केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख टरबूज म्हणून करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी फडणवीसांव टीका करण्याचे टाळत त्यांचा उल्लेख देवाभाऊ असा केला.
राज ठाकरेंची भेटीत काय ठरंल?
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेटीमध्ये राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांना विधान परिषद देण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यासोबतची भेट ही सदिच्छा भेट होती. त्यामध्ये कुठलही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.