पालघर प्रतिनिधी
नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील एका प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. २३ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असून, संशयित आरोपी आरिफच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे १०० हून अधिक अश्लील आणि न्यूड व्हिडिओ असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी समाजमाध्यमांवर केला आहे.
नालासोपारा लव जिहाद
23 वर्षाचा एका हिंदू मुलीने केलेली तक्रार….
"आरीफ माझेप्रमाणे इतर मुलींसोबत देखील शरिरीक संबंध करीत असुन त्यांचे न्यूड फोटो त्याचे मोबाईलमध्ये ठेवत आहे, असे समल्यावरुन मी आरीफ यास सदरबाबत जाब विचारला असता आरीफ याने……
मला दमदाटी करुन शिवीगाळ केली व मला…
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 15, 2026
पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरिफ हा तिच्याशिवाय इतर महिलांशीही शारीरिक संबंध ठेवत होता. तसेच त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये साठवून ठेवत असल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पीडितेने आरिफकडे विचारणा केली. मात्र, त्यानंतर त्याने संतापून तिला घराबाहेर पडण्यास बंदी घातली. शिवीगाळ आणि धमकावण्यासोबतच तिच्या इच्छेविरुद्ध दररोज जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरिफ, त्याचा साथीदार साहिल आणि आरिफची आई रुक्साना या तिघांनी मिळून पीडितेला मारहाण केली. या वेळी तिचा मोबाईलही फोडण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर रुक्साना हिने पीडितेला आरिफसोबत लग्न करावे लागेल आणि बुरखा परिधान करण्याची तयारी ठेवावी, अशा शब्दांत धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाबाबत किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पोलिसांकडे अशा प्रकारच्या पाच स्वतंत्र तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुख्य संशयित आरोपी आरिफच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये विविध महिलांचे १०० हून अधिक अश्लील व्हिडिओ आढळल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे नालासोपारा परिसरात संताप व्यक्त होत असून, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


