मुंबई प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी गोव्यातील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर वैद्यकीय सूत्रांनी आणि डॉक्टरांनी त्यांच्या अखेरच्या क्षणांविषयी अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती दिली आहे.
Watch | गोवा: मणिपाल अस्पताल के ऑन्कोलॉजी विभाग के प्रमुख डॉ. शेखर सालकर ने कहा, "हमें बेहद दुख के साथ बताना पड़ रहा है कि नाना पाटेकर को करीब 4:20 बजे हमारे अस्पताल लाया गया था और उन्हें मृत अवस्था में लाया गया था। हमने उन्हें सीपीआर देकर बचाने की पूरी कोशिश की, लेकिन करीब 5:20… https://t.co/k0oaTdeXk8 pic.twitter.com/yJn3y8QflY
— यूनीवार्ता (@univartaindia1) October 8, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास (२:३० वाजता) आपल्या एका मित्राला मेसेज करून आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचं कळवलं होतं. मात्र, दुर्दैवाने मित्राच्या उशिरा लक्षात आल्यामुळे वेळेवर मदत पोहोचू शकली नाही. पहाटेच्या सुमारास जेव्हा मित्राने तो मेसेज पाहिला, तेव्हा त्याने तातडीने नाना पाटेकर यांच्या गोव्यातील घरी धाव घेतली.
मित्र जेव्हा घरी पोहोचला, तेव्हा नाना पाटेकर यांची प्रकृती अतिशय खालावली होती. त्यांना मोठ्या प्रमाणात घाम फुटला होता आणि ते जमिनीवर कोसळले होते. तात्काळ केअरटेकर आणि मित्राने त्यांना रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू केली. पहाटे सुमारे ४:२० ते ४:३० च्या सुमारास रुग्णालयात नेत असतानाच वाटेत डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ‘सीपीआर’ (CPR) देण्यास सुरुवात करण्यात आली.
रुग्णालयातील वैद्यकीय टीमनेही वेळेचा विलंब न करता अतिशय वेगाने उपचार सुरू केले. डॉक्टर आणि त्यांच्या टीमने मिळून जवळपास ४५ मिनिटे नाना पाटेकर यांना वाचवण्यासाठी सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपचारांना यश आलं नाही आणि पहाटे ५:२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या दुर्दैवी प्रसंगी त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य उपस्थित नव्हते, मात्र त्यांचे केअरटेकर आणि काही जवळचे मित्र त्यांच्यासमवेत होते. नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणले तेव्हा ते मृत अवस्थेत असल्याने नियमानुसार या प्रकरणाची नोंद करून मेडिको-लीगल प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यांचे पार्थिव पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले असून, त्यानंतर ते कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाईल.


