मुंबई प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार वरुण सरदेसाई यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून पूर्ण करण्यात आलेल्या विविध सुशोभीकरण व विकासकामांचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ११) शिवसेना नेते तथा विभागप्रमुख आमदार अनिल परब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला सायंकाळी ७ वाजता सरपोतदार चौक, एमआयजी क्लब येथे सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन होईल. त्यानंतर ७.१५ वाजता रुस्तमजी ओरियाना येथील चौकाच्या सुशोभीकरणाचे, ७.३० वाजता बीकेसी मेट्रो स्थानकासमोरील जंक्शनच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच ७.४५ वाजता संत ज्ञानेश्वर नगर येथील माऊली रहिवासी सेवा संघ परिसरात बांधण्यात आलेल्या बालवाडीचे उद्घाटन होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वांद्रे पूर्व विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

