नागपूर प्रतिनिधी
नागपूर : नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ एप्रिल २०२६ रोजी बेपत्ता झालेल्या नंदिनी नागेश खोबरागडे (वय ३६) यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नसून, त्यांचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी नागरिकांचे सहकार्य मागितले आहे. या प्रकरणात खात्रीशीर माहिती देणाऱ्यास ₹४० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिनी खोबरागडे या घरातून बाहेर पडल्यानंतर परत आल्या नाहीत. त्यानंतर त्यांचे पती नागेश वामनराव खोबरागडे यांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. कुटुंबीयांनी विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांचा मोबाईल फोनही बंद असल्याची माहिती आहे.
नंदिनी खोबरागडे यांच्या उजव्या हातावर “Nagesh” असे टॅटू असून, ही त्यांची प्रमुख ओळख असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, नंदिनी खोबरागडे यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा त्या कुठेही आढळल्यास नागरिकांनी तातडीने नागपूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. योग्य व खात्रीशीर माहिती देणाऱ्यास ₹४० हजारांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
संपर्क क्रमांक :
📞 9096454733
📞 0712-2706343 / 2743088
📞 8378819497


