मुंबई प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष आयु. सिद्धार्थ कसारे यांच्या मातोश्री दिवंगत जनाबाई देवराम कसारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सभा सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता धारावी येथील नालंदा को-ऑपरेटिव्ह सोसायटी, मुकुंद नगर, सायन-बांद्रा लिंक रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. दिवंगत जनाबाई कसारे यांचे ७ जून २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदासजी आठवले प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राहुल बोधी महाशय यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमात प्रकाश कमलाकर जाधव हे बौद्ध वंदना सादर करणार आहेत.
कसारे कुटुंबीयांच्या वतीने समाजबांधव, कार्यकर्ते, मित्रपरिवार व नागरिकांनी उपस्थित राहून दिवंगत जनाबाई कसारे यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध पंचायत समिती शाखा क्र. ३४२, यशोधरा महिला मंडळ, प्रज्ञा बुद्ध विहार सेवा समिती, करुणाडी बौद्ध विकास संघ तसेच मुंबई व ग्रामीण परिसरातील सामाजिक संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.


