पुणे प्रतिनिधी
पुणे : वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मातोश्री आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच प्रशासन, राजकीय व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आईच्या निधनाने मुंढे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, विविध मान्यवरांकडून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत. तुकाराम मुंढे सध्या पश्चिम बंगालमध्ये असून, ते आज सायंकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यानंतर ते तातडीने पुण्याकडे रवाना होऊन पुढे बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना येथे पोहोचणार आहेत.
दरम्यान, आसराबाई मुंढे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील अशोक मुंढे यांच्या निवासस्थानी आज रात्री ९ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.
उद्या सकाळी ताडसोन्ना (जि. बीड) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


