
मुंबई:प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील आपल्या दरे गावी पोहोचले आहेत. नाराज झाल्याने एकनाथ शिंदे गावाला गेल्याचा दावा विरोधक करत आहेत.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपण नवीन महाबळेश्वर प्रोजेक्टवर काम करत असल्याचं सांगितलं आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला अनेकदा गावी यावं लागेल असंही ते म्हणाले आहेत. तसंच 235 गावं अंतर्भुत असून 295 गावांनी आणखी मागणी केली आहे असंही त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
दरम्यान साताऱ्यातील आपल्या गावी जाण्यावरुन होणाऱ्या टीकेवर ते म्हणाले की, “कोण काय बोलतं याकडे मी लक्ष देत नाही. मी येथे कामात आहे. नवीन महाबळेश्वरा हा मोठा प्रोजेक्ट आहे. याच्या मागे लागलो आहे. मी गावी आलो की नाराज झाले असं म्हणतात. पण हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला अनेकदा गावी यावं लागेल, या भागात फिरावं लागेल. प्रतापगडापासून ते पाटणपर्यंत हा मोठा परिसर आहे. 235 गावं अंतर्भुत आहेत. 295 गावांनी आणखी मागणी केली आहे. पर्यटन जिल्हा म्हणून याची ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठी जे कामं करायची आहेत ती भुमीपूत्र म्हणून घ्यावी लागतील.