मुंबई प्रतिनिधी
किशोरी पेडणेकर यांची मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी झालेली निवड ही केवळ राजकीय नेमणूक नसून पालिकेतील सत्तासंतुलनातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. भाजपकडून रितू तावडे यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेने पेडणेकर यांच्या रूपाने प्रत्युत्तर देत पालिकेतील प्रमुख पदांवर महिलांचे वर्चस्व अधोरेखित केले आहे.
सोमवारी दुपारी पेडणेकर यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाचा औपचारिक कार्यभार स्वीकारला. २००० साली विरोधी पक्षनेतेपदाची पद्धत सुरू झाल्यापासून हे पद केवळ पुरुषांकडेच राहिले होते; त्यामुळे मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका महिलेकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा गेली आहे.
पेडणेकर यांनी यापूर्वी शिवसेना सत्ताकाळात महापौरपद भूषवले होते. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली आणि आता विरोधी पक्षनेतेपदही त्यांच्या हाती दिले आहे. महापौर, गटनेते व विरोधी पक्षनेते अशी तिहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या स्थायी, शिक्षण, सुधार व बेस्ट (विद्युत पुरवठा व परिवहन) समित्यांवर सदस्यांची नेमणूक पूर्ण झाली असून अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
समिती अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेली नावे
स्थायी समिती : भाजपकडून प्रभाकर शिंदे व हरिष भांडिर्गे (बंगिर्दे) यांच्यात स्पर्धा; यापैकी एकाची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता.
शिक्षण समिती : भाजपकडून राजेश्री शिरोडकर व तेजस्विनी घोसाळकर यांच्यात चुरस.
सुधार समिती : शिवसेनेकडून संध्या दोषी (दोशी) यांची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता.
बेस्ट समिती : शिवसेनेकडून तृष्णा विश्वासराव यांना संधी मिळण्याची शक्यता.
स्थायी समिती (भाजप) सदस्य
गणेश खणकर, प्रभाकर शिंदे, राखी जाधव, अॅड. मकरंद नार्वेकर, हरिष भांडिर्गे, शिवकुमार झा, शीतल गंभीर, प्रकाश दरेकर, प्रीती सातम, तिवाना ताजिंदरसिंग.
सुधार समिती सदस्य
प्रकाश गंगाधरे, अलका केरकर, चंदन शर्मा, महादेव शिवगण, दीपक तावडे, स्वप्ना म्हात्रे, अनिष मकवानी, तेजस्वी घोसाळकर, साक्षी दळवी, संदीप पटेल.
शिवसेना : अमेय घोले, संध्या दोशी, किरण लांडगे, अजित रावराणे.
शिवसेना (ठाकरे) : मिलिंद वैद्य, उर्मिला पांचाळ, सचिन पडवळ, राजेंद्र रावत, विशाखा राऊत, हितेंद्र बडवे, लोकरे.
काँग्रेस : अशरफ आझमी.
एमआयएम : शहाबाज शेख.
मनसे : सुप्रिया दळवी.
शिक्षण समिती सदस्य
राजेश्री शिरोडकर, स्वप्ना म्हात्रे, सुषमा सावंत, शिवा शेट्टी, योगिता कोळी, डॉ. नील सोमैया, रोहन राठोड, श्रीकला पिल्ले, विक्रमसिंह राजपूत.
विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) समिती सदस्य
आकाश पुरोहित, सुनील गणाचार्य, संतोष मेढेकर, अजय सिंह, प्रमोद वाकोडे, रमाकांत गुप्ता.
पालिकेतील महत्त्वाच्या चारही समित्यांवर सत्ताधारी भाजप-शिंदे सेना व विरोधी ठाकरे सेना यांच्यातील राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न दिसत असून अध्यक्षपदांच्या अंतिम निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून पेडणेकर यांची आक्रमक भूमिका आणि समिती अध्यक्षपदांवरील निवडी यावरून पालिकेतील पुढील राजकारणाची दिशा ठरणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.


