सातारा प्रतिनिधी
सातारा नगरपरिषदेत रिपब्लिकन सेनेला मिळालेल्या घवघवीत यशानिमित्त पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे यांनी जलमंदिर पॅलेस येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शाल, श्रीफळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती देऊन उबाळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी, रमेश उबाळे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करत असल्याचे सांगितले. त्यांनी सुचविलेली विकासकामे प्राधान्याने मार्गी लावून त्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी उबाळे यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, रमेश उबाळे यांनी जिल्ह्यातील रस्ते विकास, एमएसआरडी तसेच केंद्र सरकारच्या निधीतून सुरू असलेली विकासकामे वेगाने पूर्ण करण्याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या.
या वेळी जिल्हाध्यक्ष विशाल भोसले, नितीन रोकडे, पद्मा सुतार, सुरेखा धोत्रे, दीपक गाडे, गौतम रणदिवे, रमेश गायकवाड, ज्योती गंगावणे आदी उपस्थित होते.


