
पुणे:प्रतिनिधी
राज्यातील बोगस शाळांवर कारवाई केली जाणार आहे. जे चुकीचे आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला.
त्याचबरोबर पिंपरी चिंचवड मधील शाळेत भेट दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले, गरिबातील गरीब विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं हा आमचा मानस असला पाहिजे फी साठी सुद्धा एक मर्यादा पाहिजे. शाळा वाटेल त्या पद्धतीने फी वाढवू शकत नाहीत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जाईल. दहावी आणि बारावी परीक्षा कशा कॉपीमुक्त होतील हे आम्ही पाहत आहोत. प्रत्येक शिक्षण विभागाचा आढावा आम्ही घेतोय. विजेच्या काही अडचणी आहेत.
शिक्षक भरती करणार असल्याचे सांगून भुसे म्हणाले, सी बी एस सी पॅटर्न मराठी मध्ये घेण्यासाठी काम प्रगतीपथावर आहे. पहिली वर्गाला ते स्वीकारतो आहोत. राज्यव्यापी इतिहासाला प्राधान्य असेल. २५-२६ मध्ये या संदर्भातील २ पॅटर्न आपण राबवणार आहोत.
महापालिका निवडणुका संदर्भात बोलताना भुसे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहोत. निवडणुकीसाठी आमचे शिवसैनिक कधी ही तयार असतात
सैफ आली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले काल जी घटना घडली ती वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ असा नाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण झाली आहे.