मुंबई प्रतिनिधी
वांद्रे पूर्व आणि सांताक्रूझ परिसरातील वाढती पाणीटंचाई अखेर विधानसभेत पोहोचली आहे. स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी अधिवेशनात सरकारकडे ठाम मागणी करत म्हटले की, “आमच्या भागाचे पाणी इतरत्र वळवणे तात्काळ थांबवा आणि पाणीपुरवठा तातडीने सुधारावा.
वांद्रे पूर्व आणि सांताक्रूझ परिसरातील पाणीटंचाई तात्काळ दूर करण्यासाठी मी सरकारकडे ठाम मागणी केली आहे.
या दोन्ही भागांना दररोज आवश्यकतेपेक्षा खूपच कमी पाणीपुरवठा होत आहे. त्याचवेळी मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बांधकामे, बुलेट ट्रेन प्रकल्प आणि BKC मधील कार्यालयांची वाढ — यामुळे… pic.twitter.com/cSHQ5GSa25
— Varun Sardesai (@SardesaiVarun) December 11, 2025
स्थानिक नागरिकांना दररोज आवश्यकतेपेक्षा खूपच कमी पाणी मिळत असून अनेक भागांत दिवसातून काही वेळच नळाला पाणी येत असल्याची तक्रार आहे. दुसरीकडे, परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बांधकामे, बुलेट ट्रेन प्रकल्प आणि BKC मधील वाढती कार्यालये, या सर्वांना मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा होत असल्याचा संशय स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या असमान पाणीवाटपामुळे नागरिकांमध्ये तणाव वाढत असून इमारती विरुद्ध झोपडपट्ट्या किंवा सोसायटी विरुद्ध सोसायटी असे चित्र निर्माण होत आहे. मात्र मूळ समस्या पाणीपुरवठ्याच्या अयोग्य नियोजनाची असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
सरदेसाई म्हणाले, “वांद्रे आणि सांताक्रूझचा हिस्सा कुठेही दुसरीकडे वळवण्याची गरज नाही. आमच्या भागातील लोकांना त्रास देणे थांबवा. पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करा.
स्थानिक नागरिकांच्यात पाणीटंचाईबाबत संताप वाढत असताना आता शासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


