मुंबई प्रतिनिधी
वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रातील न्यू शासकीय वसाहत येथे बाइक पार्किंगसाठी नवीन शेड उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन रविवारी पार पडले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच मुंबई उपनगर संपर्क मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवण्यात आला. शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांच्या प्रयत्नांना यानिमित्ताने यश मिळाले.
भूमिपूजन विधी कुणाल सरमळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी महिला विभागप्रमुख भक्ती भोसले, विधानसभा अध्यक्ष कैलास येरुंकर, शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे सुमित वजळे, तसेच विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन शेडच्या बांधकामामुळे परिसरातील रहिवाशांना सुरक्षित आणि सुव्यवस्थित पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. सार्वजनिक सुविधांच्या उभारणीद्वारे जनसेवा मजबूत करण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.


