
पत्रकार :उमेश गायगवळे
आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. विशेष म्हणजे 12 वर्षांपासून या मंदिराचे काम सुरु होते. हे हेडिंग काम पूर्ण झाले.
अखेर नवी मुंबईतील खारघरमध्ये उभारण्यात आलेले इस्कॉन मंदिर पूर्णपणे तयार झाले आहे. नऊ एकरमध्ये पसरलेले हे आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे.
भगवान कृष्णाला समर्पित या भव्य मंदिराचे नाव ‘श्री श्री राधा मदन मोहन जी’ मंदिर असे आहे. मंदिराच्या उद्घाटनापूर्वी एक आठवड्याचा विशेष धार्मिक कार्यक्रम आणि यज्ञविधी पार पाडला जात आहे. या मंदिराच्या उद्घाटनासोबतच पीएम मोदी सांस्कृतिक केंद्र आणि वैदिक संग्रहालयाची पायाभरणीही करणार आहेत. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित राहणार त्याचबरोबर अनेक मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
संगमरवरी दगडामध्ये हे बनलेले मंदिर असून सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
हे भव्य मंदिर पांढऱ्या आणि तपकिरी संगमरवराच्या खास दगडांनी बांधलेले आहे. पीएम मोदींनी यापूर्वी 12 ऑक्टोबर 2024 रोजी मंदिराला भेट दिली होती. संगमरवरी बनलेले हे मंदिर 200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. मंदिराचा दरबार भगवान कृष्णाच्या अनेक मनोरंजनांच्या 3D चित्रांनी सजलेला आहे. त्याचबरोबर दशावतार मंदिराचे दरवाजे अनेक किलो चांदीचे आहेत.
दरवाजांवर गदा, शंख, आणि ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा कोरलेल्या आहेत. ग्लोरी ऑफ महाराष्ट्र प्रकल्पाअंतर्गत हे मंदिर बांधण्यात आले आहे. इस्कॉन मंदिराचे संस्थापक श्रील प्रभुपाद जी यांच्या तीन मूर्ती, देश-विदेशातील त्यांच्या अनुयायांच्या मूर्ती, त्यांची छायाचित्रे आणि त्यांची पुस्तके यांचे स्मारकही बांधण्यात आले आहे. इस्कॉनची जगभरात सुमारे 800 मंदिरे आहेत, परंतु नवी मुंबईतील हे मंदिर एकमेव असे मंदिर असेल ज्यामध्ये त्यांचे संस्थापक प्रभू पद जी यांचे स्मारक बांधण्यात आले आहे.
मंदिरात या आहेत सुविधा
– या मंदिरासमोर एक मोठी बाग आहे, ज्यात कारंजे आणि अतिशय सुंदर प्रकाशयोजना करण्यात आली आहे.
– मुख्य मंदिर आणि त्याच्या छतावरील कलाकृती पांढऱ्या, सोनेरी आणि गुलाबी रंगात सजवलेल्या आहेत.
– आंतरराष्ट्रीय अतिथीगृह, बोट फेस्टिव्हलसाठी मोठा तलाव
– वैदिक शिक्षण महाविद्यालय ग्रंथालय, विशाल प्रसादम हॉल
– आयुर्वेदिक उपचार केंद्र, जिथे आयुर्वेद, योगाभ्यास आणि मंत्र अभ्यास इ. आयोजित केले जातील.
– शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट, जेथे भगवान कृष्णाचे आवडते पदार्थ दिले जातील.
– या मंदिरात तीन हजार भाविकांना एकत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे मंदिर भाविकांचे आकर्षक ठरणार आहे.