मुंबई प्रतिनिधी
पॅन कार्ड हे तुमच्या आर्थिक जगाचे प्रमुख ओळखपत्र. कर रिटर्न भरणे, बँक खाते उघडणे, शेअर बाजारात गुंतवणूक, मोठे व्यवहार, यासाठी पॅन आवश्यक आहे. पण १ जानेवारी २०२६ पासून तुमचे पॅन कार्ड अचानक निष्क्रिय झाले तर? कर भरण्यासाठी गेल्यावर, बँकेत खाते उघडताना किंवा व्यवहार करताना ‘पॅन बंद’ असा संदेश मिळाल्यास काय?
पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत जवळ
सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पॅन आणि आधार लिंक न केल्यास १ जानेवारी २०२६ पासून पॅन कार्ड डिएक्टिव्हेट होईल. लाखो नागरिकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे वेळेत हे काम पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.
पॅन निष्क्रिय झाल्यास,
* आयकर रिटर्न दाखल होणार नाही
* बँकिंग सेवा अडचणीत
* गुंतवणूक व आर्थिक व्यवहार अडथळ्यात
* आर्थिक नुकसान अनिवार्य
म्हणूनच आर्थिक जगतातील तुमची ओळख टिकवण्यासाठी तातडीने पॅन-आधार लिंक करा.
ऑनलाइन लिंकिंगची सोपी प्रक्रिया
फक्त काही मिनिटांत काम पूर्ण:
* आयकर विभागाच्या ई-पोर्टलवर जा : https://www.incometax.gov.in/iec/foportal/
* होमपेजवर ‘Link Aadhaar’ पर्याय निवडा
* तुमचा पॅन व आधार क्रमांक भरा
* सूचनांनुसार प्रक्रिया पूर्ण करत ₹1000 शुल्क भरा
* सबमिट करा, लिंकिंग प्रक्रिया सुरू होईल
सूचना: ओटीपीसाठी आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांकच वापरा.
लिंकिंग स्टेटस कसे तपासाल?
ऑनलाइन: ‘Link Aadhaar Status’ निवडून पॅन आणि आधार क्रमांक भरा.
SMS:
UIDPAN <आधार क्रमांक> <पॅन क्रमांक>
हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा.
उशीर म्हणजे मोठे नुकसान
अंतिम मुदत चुकली तर दंड, व्यवहारांची अडचण आणि आर्थिक फटकक, हे सर्व टाळण्यासाठी आजच लिंकिंग पूर्ण करा. आर्थिक व्यवस्थेला पारदर्शक बनवण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे, आणि नागरिक म्हणून ही जबाबदारी पूर्ण करणे आवश्यक आहे.


