
पत्रकार :उमेश गायगवळे
खार पूर्व :छत्रपती नगर विकास कमिटी ते करीरा नगर येथील सांडपाण्याच्या त्रासाबद्दल स्थानिक शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी आज शिवालिक वेंचर यांच्या अधिकाऱ्यासमोर विभागातील ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून संरक्षित भिंत बांधण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले तसेच या पाहणी दौऱ्यात उपविभाग प्रमुख माजी नगरसेवक दीपक भुतकर, शाखाप्रमुख संदीप शिवलकर, उपशाखाप्रमुख अनंत शेलार, जवाहर गौंड, नंदकुमार परब, शरद मोहिरे, अरुण गोवणकर, झाकीर कुरेशी, शिवसेनिक स्थानिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते