
वांद्रे प्रतिनिधी
वांद्रे : मतदारसंघातील डिफेन्स लँडवरील रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पावर लक्षवेधी सूचना मांडल्याप्रमाणे, स्थानिक आमदार वरून सरदेसाई यांच्या वतीने मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण खात्याचे अधिकारी, SFA अधिकारी आणि स्थानिक रहिवासी यांची बैठक पार पडली.
मागील महिन्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याही भेटीद्वारे या प्रकल्पाची भूमिका ठळक करण्यात आली होती. बैठकीत ठरल्याप्रमाणे, महाराष्ट्र सरकारमार्फत डिफेन्स लँडवरील झोपडपट्टींच्या नर्वसनासाठी नवीन ३ प्रस्ताव केंद्रीय संरक्षण खात्याला पाठवले जातील. तसेच, यापुढील पाठपुराव्यासाठी गृहनिर्माण खात्याचा आणि SRA चा एक नोडल अधिकारी नेमण्यात येईल.
बैठकीस माजी नगरसेवक राजू भूतकर आणि स्थानिक नागरिकही उपस्थित होते. या निर्णयामुळे वांद्रेतील रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.