
मुंबई:प्रतिनिधी
ममता दिन अर्थात स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथील मासाहेबांच्या स्मारकावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मासाहेबांना अभिवादन केले.
यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे,उपनेते महापौर मिलिंद वैद्य, उपनेते गुरुनाथ खोत ,शिवसे सचिव साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख महेश सावंत, विभाग संघटक माजी महापौर श्रद्धा जाधव तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक उपस्थित होते.