
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : नवरात्रीच्या निमित्ताने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण सक्षमीकरण अभियान या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे महाराष्ट्र प्रमुख सुमित वजाळे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पार पडला.
या अभियानांतर्गत बहिणींना स्वयंरोजगार निर्मिती व उद्योजकतेचे प्रशिक्षण दिले जाणार असून, त्या स्वावलंबी व सशक्त होण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले जाईल. महाराष्ट्र औद्योगिक विकास केंद्राच्या (MCED) सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार असून, मुंबईसह राज्यातील अधिकाधिक महिलांना उद्योजिका बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार मनिषा कायंदे, शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या शितल म्हात्रे, झोपडपट्टी महासंघ मुंबई उपाध्यक्ष राणी वजाळे यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी असंख्य महिला, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.