
पत्रकार :उमेश गायगवळे
मुंबई- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील गेल्या ७५ वर्षापासून ज्यांनी एसटीच पाहिले नाही. अशा गावमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एसटी सुरू करून स्थानिक आदिवासींना नवीन वर्षाची जणू भेटच दिली.
त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात अनेक प्रकल्पांची मूर्तमेढ रोवली जात आहे. कोणसरी येथील लॉयन्ड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या पोलाद कारखान्यासह विविध प्रकल्पांचा कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचबरोबर आज राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज २ जानेवारी रोजी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर दर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचेही सांगण्यात आलं.
“बैठकीतले निर्णय “
शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये आकारी जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय महाराष्ट्रातील ९६३ शेतकऱ्यांच्या ४ हजार ९४९ एकर जमिनी परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेत संपूर्ण ९६२
शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या मालकीच्या केल्या आहेत. यासाठी रेडी रेकनर च्या २५% रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.