
मुंबई, प्रतिनिधी
खार पूर्व, जवाहरनगर पाईपलाईन रोड, सिंह लाईम डेपो गेटजवळील एमटीएनएलचा बॉक्स अनेक महिन्यांपासून मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे. गंजलेले दरवाजे उघडे पडल्याने पादचारी व वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
या मार्गावरून रोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलांच्या अंगावर बॉक्स कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जागृत नागरिक बाबू अनभवने यांनी महानगरपालिका व एमटीएनएल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून हा बॉक्स तातडीने दुरुस्त करावा किंवा वापरात नसेल तर हटवून जागा मोकळी करावी, अशी मागणी केली आहे.