नाताळ आणि नववर्षा निमित्त राज्यातील हॉटेल परमिट रूम आणि आर्केस्ट्रा बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार—राज्य सरकारचा मोठा निर्णय.
सातारा प्रतिनिधि
December 24, 2024

पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. नवीन वर्ष सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत यासाठी सगळेजण जय्यत तयारीला सुरुवात केली आहे.
आता राज सरकारने, नाताळ आणि नवीन वर्षा निमित्त राज्यातील खदग्रह, हॉटेल रेस्टॉरंट, परमिट रूम आणि आर्केस्ट्रा बार पहाटे ५ वाजेपर्यंत खुले ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे ही परवानगी विशेषतः दिनांक २४,२५ आणि ३१ डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी पर्यंत लागू असेल ग्रह विभागाने याबाबतचे महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.
विशेषतः जनरल सेक्रेटरी इंडियन हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशन यांनी दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजीच्या पत्रान्वये शासनास विनंती केली होती. या विनंतीला आता प्रशासन हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आत्ता नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम व आर्केस्ट्रा बार पहाटे पाच वाजेपर्यंत खुली राहणार आहे.
दरम्यान, नववर्षाच्या स्वागतासाठी, हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार चालकाने सरकारांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे नागरिकांना क्रिसमस आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत आपल्या मित्रमंडळी सोबत सेलिब्रेशन करण्याची संधी मिळणार आहे. पोलिसांकडून या काळात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्यास मनाई करण्यात आली असून, ट्राफिक पोलिसाच्या पथकाकडून तपासणी केली जाणार आहे.