
मुंबई प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशीच राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त (एपीआय) आणि पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) दर्जाच्या तब्बल 29 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी आज (14 ऑगस्ट) सायंकाळी हा आदेश काढला असून, बदल्यांनंतर तातडीने नव्या पदस्थापनेवर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गृहविभागाच्या आदेशानुसार, मुंबईचे एपीआय दौलत आबाजी साळवे यांची पिंपरी-चिंचवड, तर शशिकिरण बाबासो काशिद यांची अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली झाली आहे. मनिषा सदाशिव नलावडे यांची राज्य गुप्तवार्ता विभागात अप्पर पोलीस उपायुक्त, विजय शंकरलाल जैस्वाल यांची दहशतवाद विरोधी पथकात, तर अजीत राजाराम टिके यांची सातारा ग्रामीणमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. फोर्स वनचे डीवायएसपी सुनिल रामदास लाहिगुडे आता मुंबईत कार्यरत राहणार असून, मिरा-भाईंदर-वसई-विरारचे एपीआय उमेश शंकर माने यांची भंडारा, आणि ठाण्याचे एपीआय अमोल विलास कोळी यांची गडचिरोली येथे बदली झाली आहे.
अकोला शहरातील डीवायएसपी सतीश संजयराव कुलकर्णी यांची अमरावतीत, तर बुलढाण्याचे माधवराव रावसाहेब गरुड यांचीही अमरावतीत नियुक्ती झाली आहे. रोशन भुजंगराव पंडित नागपूरला जात आहेत. पुण्याचे एपीआय मच्छिंद्र रामचंद्र खाडे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये, रायगड-रोहा येथील रविंद्र दौंडकर ठाण्यात, तर रविंद्र पांडुरंग चौधर लातूर-चाकूरला पोहोचणार आहेत. प्रशांत पांडुरंग संपते लातूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत कार्यरत होणार असून, बीड-गेवराईचे निरज बाजीराव राजगुरु अहिल्यानगर-शेवगाव येथे जात आहेत.
लातूरचे डीवायएसपी रणजीत नारायण सावंत सातारा-दहिवडी येथे, समीरसिंध द्वारकोजीराव साळवे लातूरमध्ये, तर अमरावतीच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे डीवायएसपी श्रीहरी भानुदास पाटील खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यभार स्वीकारणार आहेत. मुंबईचे एपीआय प्रेरणा जीवन कट्टे नवी मुंबईत रुजू होतील. सुनिल सदाशिव साळुंखे सातारा-वाई, निलेश श्रीराम पालवे छत्रपती संभाजीनगर-गंगापूर, आणि श्रीकांत औंदुबर दिसले दक्षता पथक, पुणे कारागृह व सुधारसेवेत जात आहेत.
तसेच, छत्रपती संभाजीनगरचे एपीआय रणजीत जगन्नाथ पाटील पिंपरी-चिंचवडला, चंद्रपूरचे डीवायएसपी सुधाकर पोपट यादव आणि दिलीप देवराव टिपरसे अनुक्रमे पिंपरी-चिंचवड आणि परभणी-गंगाखेड येथे जातील. रायगडच्या महाडचे शंकर भाऊसाहेब काळे आणि धाराशीव-तुळजापूरचे निलेश विश्वासराव देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. बजरंग हिंदूराव देसाई यांची नियुक्ती मिरा-भाईंदर-वसई-विरार येथे झाली आहे.
या सर्व बदल्यांमुळे अनेक जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणेतील कार्यपद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी झालेल्या या मोठ्या फेरबदलामुळे राज्य पोलीस दलात चांगलीच खळबळ माजली आहे.